Thursday, November 15, 2012

शिव आणि शंकर

!! ॐ !!
आपल्यापैकी खूप जणांचा असा समज आहे कि शिव म्हणजे ज्याची भक्ती शिवलिंग या रुपात केली जाते तो आणि शंकर हे एकच आहेत . मला हि असेच वाटायचे , पण असे नाही शिव आणि शंकर या २ वेगळ्या गोष्टी आहेत .
"शिव " हि एक महाशक्ती आहे , ती निराकार आहे ती अशारीरिक उर्जास्त्रोत  आहे . ज्याप्रमाणे हवा आहे पण हवा दिसत नाही ,तिचे वादळ रुपात शक्तीप्रदर्शन होते, उष्णता आहे ती दिसत नाही , पण तिचे चटके लागतात अश्या अनेक लहान मोठ्या शक्ती या वातावरणात आहेत ज्या आहेत पण आपल्याला दिसत नाही , पण योग्य प्रकारे योग, ध्यान धारणा करून त्या शक्ती आपण आत्मसात करू शकतो . शिव हि या सगळ्या शक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे , ती दिसत नाही पण ती आहे, ती महाशक्ती ब्रम्हांडाच्या उत्पत्तीचे केंद्र आहे . हल्लीच एक संशोधन झाले होते " बोसोन " कणांचा , म्हणजे देवकणांचा . त्या संशोधनातून देवाच्या देवत्त्वाचीच परीक्षा आहे, पण अजूनही ते सिद्ध झाले नाही , भविष्यात हा प्रयोग कितपत प्रगत होणार आहे हे आत्ताच सांगता येत नाही .



 "शंकर " हे त्या म्हाश्क्तीचे एक साकार रूप आहे . ज्याप्रमाणे आपले शरीर आहे,हाडा मांसाचे  पंचतत्त्वांनी बनलेले त्याच प्रमाणे शंकर हे शिवाचे एक साकार रूप आहे . शंकराची कुठे हि प्रतिमा बघा तो शिवलिंगा समोर ध्यान लावून बसलेला दाखवला जातो , योग करताना दाखवला जातो , योग आणि ध्यान धारणा करून शंकराने शिव ह्या महाशक्तीला प्रसन्न केले होते , आणि ब्रम्हांडात असलेल्या त्या अनेक अमानवीय शक्ती अवगत केल्या होत्या. शंकर हा जाठाधारी आहे, गळ्यात नाग आहे, हातात त्रिशूळ आहे, डमरू आहे , तो रुद्राक्ष धारण करून आहे . त्याच्या अंगावर कोणते हि दागदागिने नाही , तो कमरे खाली वाघाचे कातडे नेसून आहे , असे म्हंटले जाते कि तो त्रिनेत्री आहे. शंकराचा  तिसरा डोळा म्हणजे त्याच्याकडे असलेल्या त्या अमानवीय शक्तींचे प्रतिक आहे ज्या शक्ती सामान्य माणसाकडे नाही . त्रिशूळ हे आधुनिक पद्धतीचे शस्त्र आहे , साडेतीन वेटोळे घातलेला नाग हा कुंडलिनी च्या  साडेतीन चक्रांचा प्रतिक आहे , कुंडलिनी हि सर्पा प्रमाणे आहे , कारण कुंडलिनी जागृत करण्यासाठी पंचेन्द्रीयांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे , अथवा ते घातक ठरू शकते , रुद्राक्ष धारण करण्यामागे हि शास्त्र आहे , जे त्याकाळात शंकराला माहिती होते , डमरू हे संगीताचे प्रतिक आहे , शंकर हा संगीताचा  देव आहे, नृत्याचा देव आहे म्हणून तो नृत्य करताना नटराज म्हणून हि ओळखला  जातो. तो देवांचा हि देव आहे तो महादेव आहे  .
आत्ता पर्यंत तुम्हाला शिव आणि शंकर यातील फरक लक्षात आला असेल . आत्ता आपण माहिती घेऊया  शंकरा बद्दल . काहींना हि माहिती अपवादात्मक वाटेल हि, मला जी माहिती मिळाली ती मी आपल्यासमोर मांडत आहे , मी फक्त मला मिळालेली माहिती आपल्या समोर मांडत आहे , कितपत विश्वास ठेवावा अथवा न ठेवावा हे आपल्यावर अवलंबून आहे .

                                                                        !! ॐ !!

आपल्या इतिहासतील अनेक योद्धे, घटना यांना धार्मिक आणि पौराणिक  स्वरूप देण्यात आले होते ते पुरोहित आणि शिक्षक वर्गाकडून  समाजावर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी , शंकर हे स्वतहा अनार्य होते , म्हणजे आर्य न्हवते , शंकराने पार्वती सोबत विवाह केला, पार्वतीचे वडील  हिमाचलप्रदेश  वर राज्य करायचे , पार्वती आर्य होती , शंकर पार्वती यांचा विवाह पार्वतीच्या कुटुंबियांना व आजूबाजूच्या अनेक आर्य राज्यांना मान्य न्हवता . त्यांच्या अवमानाला आणि विरोधाला न जुमानता पार्वतीने शंकरा सोबत विवाह केला, कारण पार्वतीला दृढ विश्वास होता कि शंकर हे बलशाली आहेत , शंकराकडे त्या शक्ती आहेत ज्या तिच्याच कुळवंशातील इतर राजकुमारांकडे न्हवत्या . शंकर आणि पार्वती यांना २ पुत्र होते , गणपती आणि कार्तीक्ये . गणपती आणि कार्तीक्ये हे आपल्या सारखेच हाडा मांसाचे होते, ते होते . गणपती हा ज्ञानी, विद्वान आणि बुद्धिमान होता , त्याच्या बुद्धिमत्तेचे प्रतिक म्हणून हत्तीचे तोंड दाखवले जाते . पण गणपतीच्या ज्ञानाला झाकण्यासाठी एक काल्पनिक कथा रचून टाकली गेली जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कि गणपतीला हत्तीचे डोके कसे लावले गेले . गणपती आणि कार्तीक्ये या दोघांना आपल्या वडिलांकडे असलेल्या सर्व अध्यात्मिक शक्ती अवगत होत्या , अध्यात्मिक ज्ञान, विज्ञान,शास्त्र,वेद, आयुर्वेद या सगळ्यांचे ज्ञान पुरेपूर होते . शंकराने त्या दोघांना संपूर्ण प्रशिक्षण आणि ज्ञान दिले होते . आपल्या वडिलांकडून मिळालेल्या शक्ती आणि ज्ञान यांचा प्रसार  या दोघांनी संपूर्ण देश आणि देशा बाहेर केला . कार्तीक्येने बहुदा दक्षिण भारता च्या दिशेने  आपल्या ज्ञानाचा प्रसार केला , म्हणून कार्तीक्ये दक्षिण भारतात सुब्रामनियाम आणि मुरुगन या नावाने ओळखला जातो . या दोघांनीच बहुदा सर्वप्रथम शंकराच्या ज्ञानाचा प्रसार केला . पौराणिक कथा मध्ये असे हि म्हंटले जाते कि कार्तीक्ये याने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली होती ........ हे वाक्य हेच दर्शवते कि कार्तीक्येने शंकराच्या ज्ञानाचा प्रसार संपूर्ण जगभर केला , याचेच फ्ल्रूप आज इंडोनेशिया, जपान, पेरू,ब्राझील,मलेशिया,उरुग्वे दक्षिण अमेरिकेत आणखी हि अनेक देशात शिवलिंग सापडले जाते . पण आर्य लोकांच्या हातात नियंत्रित असलेला इतिहास यांच्या पासून वंचित राहिला , शंकराच्या जवळीक राहून मिळालेल्या पाठबळामुळे या दोघांच्या  कौशलल्याने संपूर्ण भारत देशाला खऱ्या अध्यात्मिकतेमध्ये बदलून टाकले . एक अशी आस्था, योग , ध्यान ,आराधना जी पुढील ६००० वर्षात बदलू शकलेली नाही , आजतागायत जिवंत आहे , निव्वळ जिवंत नाही तर दिवसेंदिवस आणखी वाढू लागली आहे . तरीपण आर्य लोकांनी या चौघांना पौराणिक कथांमध्ये गुंडाळून काल्पनिक स्वरूप देण्याचे काम पुरेपूर करून ठेवले आहे .

पार्वतीच्या वडिलांचे हिमालयन राजांची माहिती गायब आहे , पण पार्वतीचे वडील हे नेपाळ प्रदेशात राज्य करत असावेत आणि शंकर याच राज्यात हिमालयातील पर्वतान मध्ये अथवा आजच्या उत्तरप्रदेश बिहार नजीकच्या सीमेलगत पठारावार वास्तव्यास होते .



वेद आणि शंकर :-
ऋगवेदा मध्ये आर्य संस्कृतीने मांडलेल्या  देव देवांची नावे अशी आहेत :- इंद्र, अग्नी ,वरुण, बृहस्पती,ब्रह्मा,अरुंधती , सोम, वायू , अश्विन ,रितू  , मारुत , रुद्र , रिभस, सवितर ,ब्राम्हनास्पती . पण आज भारतामध्ये  हिंदू समाज यापैकी कोणत्याही  देवतांची आराधना करताना दिसत नाही . ब्रम्हदेवाचे एकच मन्दिर आहे पुष्कर राजस्थान मध्ये , पण त्याच्या साठी वर्षातला असा एक हि दिवस आयोजित नाही .
सर्वात जास्त प्रमाणात ज्या देवतांची आज पूजा आणि उत्सव साजरे केले जातात ते आहेत :-
१) शंकर आणि त्यांचे अविर्भाव
२) पार्वती आणि त्यांचे अविर्भाव
३) शंकर आणि पार्वती यांचे  पुत्र  गणपती , कार्तीक्ये

४) विष्णू आणि त्यांचे अवतार .
५) अनेक महामानव गुरु ज्यांना कोणत्या न कोणत्या देवाचा अवतार मानले आहे .


सिंधू संस्कृती चे देव :-


सगळ्यात पुरातन मानली जाणारी सिंधू संस्कृती , म्हणजे हडप्पा आणि मोहेन्जदाडो येथील  उत्खननात मुख्यत्व्ये पशुपतीनाथ देवता सापडते , पशुपतीनाथ म्हणजेच आज आपण ज्याला शिव /शंकर मानतो . डोक्यावर शिंग असलेले मुकुट, योग धारणा करणारा आणि आजूबाजूला वाघ, हरण, म्हैस, आणि हत्ती , त्याच बरोबर एक लाल भर्या रंगाची मातीची देवी सुद्धा सापडली आहे . सिंधू संस्कृतीचे लोक याच देवतांची भक्ती करत असत .याचा अर्थ असा कि सिंधू संस्कृती दरम्यान आर्य देव देवता भारतात अस्तित्वात न्हवत्या

शंकराचे उद्गम स्थान :- 



शिव या शब्दाचे मूळ किराट अथवा बोरोक जमाती मध्ले आहे असे किराट जमातीचे मानणे आहे . नेपाल मधील किराट नावाची एक आदिवासी जमात आहे , त्यांचे मानणे आहे कि शंकर हे एक किराटी राजा होते .

शिवा हा शब्द वेदांमध्ये कुठेच आढळत नाही, शिवा हा शब्द किराट भाषेतील " सीमानी " म्हणजे ज्ञान आणि " कैबा " म्हणजे पाच म्हणजेच सी + बा = सिबा > सिवा >सिबराई. म्हणजे तो देव ज्याला जीवनाच्या ५ तत्त्वांचे ज्ञान आहे .म्हणजे पृथ्वी अग्नी जल,वायू, आणि आकाश जे खूप मोठे अथवा महत्त्वाचे आहे .

बहुतेक त्रिपुरी भाषेत शंकराला " किराटेशवर " जे म्हणतात बहुदा किराट लोकांचा देव म्हणून हि बोलत असावेत .त्याचंचे दुसरे नाव आहे " होर " होर या शबदाचा कुठला हि संस्कृत अर्थ नाही . पण बोरोक/किराट भाषेत होर म्हणजे अग्नी ज्या नावाला शंकर पात्र आहेत . बोरोक/किराटी लोकं  " होर होर भोम भोम " म्हणून हि एक नारा देतात ,ज्याचा अर्थ अग्नीच्या ज्वाला असा आहे . बहुदा पुढे याच" होर होर भोम भोम "शंकराला त्रिपुरेश्वर अथवा त्रिपुरारी असे हि म्हणतात . कारण शंकराने त्रिपुर च्या राजाचा वध केला होता . या सर्वातून हे स्पष्ट होते कि स्थानिक बोरोक/किराट आदिवासी समाज म्हणजे आर्य संस्कृतीच्या वेढ्यातून बाहेर राहिलेला समाज आहे, पण ते शंकराची भक्ती करतात म्हणजेच ते हिंदू आहेत पण आर्य नाही .





पार्वतीचे उद्गम स्थान :- 

पार्वती ( पर्वत + इति ) हा शब्द किराट/बोरोक शब्द " हिच्वाक मां " डोंगरांची देवी,  याचे अनुवादन आहे .आणि आर्य लोकांनी याच नावाने त्यांची भक्ती केली . या देवतेचे अथवा तिच्या कोणत्या हि रूपाचे वेदांमध्ये कुठे हि विश्लेषण नाही.
अनेक पौराणिक कथांमध्ये पार्वतीच्या जन्मा बद्दल अनेक वेगवेगळ्या कथा आहेत , यातून हे स्पष्ट होते कि पार्वती हि देवता बोरोक हिंदूं वंशाची  देवता आहे. त्रिपुरी पौराणिक कथांच्या आधारे पार्वती हि उंच डोंगराळ प्रदेशातली देवता आहे , आज हि जंगलानंमध्ये तिची पूजा केली जाते . पहायला गेलो तर कोणते हि आर्य उंच डोंगर अथवा जंगलात वास्तव्यास होते असे आढळत नाही . त्याच प्रमाणे किराट / बोरोक जमात आजही डोंगर आणि जंगलात राहणे पसंत करते .म्हणूनच शंकर पार्वती मधील पार्वती अथवा वैष्णोदेवी , चामुंडा,हाडीमबा, हिमालयात उंच पर्वतावर विराजित आहे .यावरून हे स्पष्ट आहे कि पार्वती हे दैवत आर्य नसून मूळ हिंदू आहे . आत्ता वर सांगितल्याप्रमाणे असे हि असू शकते पार्वतीने शंकरा सोबत लग्न केल्यानंतर शंकराकडून मिळालेल्या अध्यात्मिक ज्ञानामुळे आणि शंकराच्या सहवासात राहिल्यामुळे तिला हि त्या सर्व शक्ती आणि ज्ञान पारंगत झाले होते म्हणून तिला हि देवत्त्व प्राप्त झाले . 
पार्वती चे दुसरे नाव आहे उमा ," उमा " हे नाव सुद्धा वेदांमध्ये कुठेच सापडत नाही पण हे नाव पुराणात मात्र आहे . मुळात किराटी लोकं त्रिपुरेश्वरी देवीला अम्मा किंवा सकानी अम्मा , म्हणजे दक्षिणेची देवी असे हि म्हणतात , आपण जर माझा " कुमारी कंदम " हा ब्लॉग वाचला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल कि अम्मा हा शब्द नेपाल मध्ये कसा काय गेला तो हि ६००० वर्षांपूर्वी पासून . पुढे अम्मा या शब्दाचा आर्य लोकांनी उच्चार निट न जमल्यामुळे किंवा आणखी काही कारणांमुळे फेरबदल करून  " उमा " असा केला आणि प्रतीकात्मक पार्वतीला दाखवले.यावरून काहीही वेडी वाकडी वळण न घेता हा अर्थ स्पष्ट होतो . याच प्रमाणे  " काली " हा रायंग उपभाषेतील  शब्द स्व्काल (swkal) म्हणजे जादुगरणी अथवा राक्षशीण आणि जेव्हा माणसाच्या रुपात येते तेव्हा  "बेडूवा " असे हि म्हंटले जाते . तर काली हा संस्कृत शब्द " स्व्काल" अथवा "  स्व्काली " या मधून उचलला आहे .म्हणून काली मातेची पूजा जंगलात केली जाते . जाडी टोणा सारख्या अमानवीय शक्तींचा प्रयोग करण्यात केली जाते .ज्या शक्ती जंगलात राहणाऱ्या या जमातींना अवगत होत्या आणि आजही आहेत पण आर्य वंशातील लोकांना या सर्व विद्या आज हि माहिती नाही .
लक्ष्मी हे नाव देखील याच प्रकारे आले आहे किराटी लोक तांदूळ आणि धन यांच्या देवतेला मैलुमा ९ मिळू + अम्मा ) म्हणतात जिला मोक्शुमा ( मोक्षु + अम्मा ) असे हि म्हणतात , पण आर्य लोकांनी मोक्शुमा या शब्दातील " म" काढून त्याला " ल" जोडला आणि पुढे लोक्षुमा > लक्षुमी . असे झाले .


गणपती चा उद्गम :-
गणपती हे नाव सुद्धा वरील सांगीत्ल्या प्रमाणेच आहे . गणपती हा  "गोरिया  " नामक मंगोलि देव आहे .मंगोलि  संस्कृती मध्ये गोरिया  देखील शंकर आणि पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जातो  . इथे पण गणपती हे दैवत वेदांमध्ये कुठे हि नाही . याचा अर्थ असा कि गणपती हे आर्य दैवत नाही , त्रिपुरातील गोरीया हे हेच दैवत आहे .गणेशाचे दुसरे नाव आहे बिनायक दुसर्या बाजूला पाहता बाबा गोरिया हे " बिनैरोक " (Binairok)  म्हणून ओछाई (Ochai) जमाती तर्फे पूजले जाते  . यातून हेच कळते कि गोरिया आणि गणेश हे एकच आहेत.  

कार्तीक्ये चा उद्गम :-
कार्तीक्ये हा गणेशाचा लहान भाऊ , आणि शंकर आणि पार्वतीचा पुत्र .म्हणून कार्तीक्ये हि किराट लोकांचेच दैवत . कार्तीक्येचे नाव हि वेदांमध्ये नाही म्हणून कार्तीक्ये हि आर्यांचे दैवत नाही .त्रिपुरी पौराणिक कथांप्रमाणे कालियाहा देव  गोरिया चा लहान भाऊ . पौराणिक सांसृतिक भेसळ झाल्यामुळे कालिया हे नाव कार्तीक्ये झाले असेल यात शंका नाही.


या सर्व गोष्टींना दुजोरा मिळावा म्हणून काही उदाहरणे देत आहे :-

१) वर्ष 1500 AD मध्ये राजा धन्या माणिक्य ने उदैपूर येथील त्रिपुरेश्वरी मंदिरा उभारले आहे .पण आत्ता हे मन्दिर पुराणात नोंद करून याला ५१ पीठांपैकी  ते पीठ मानले जाते जिथे सुदर्शन चक्राने पार्वतीच्या शरीराच्या ५१ तुकड्यांपैकी उजव्या पाय पडला होता .
२) गुवाहाटी येथील कामाख्या हे मन्दिर देखील याच प्रमाणे  कोच ( बोडो जमातीच्या  ) राजाने बांधले होते .हे देखील ५१ पिठांमध्ये सामील केले गेले आहे असे म्हंटले जाते या ठिकाणी पार्वतीचे गुप्तांग पडले होते  



 शंकर आणि वास्तविकता :- 




पुराणांमध्ये शंकराला निळकंठ असे म्हंटले आहे , म्हणजे ज्यांचा कंठ नीला आहे तो . अशी एक पौराणिक कथा प्रचलित केली गेली आहे कि देव आणि राक्षस ( इथे देव म्हणजे आर्य आणि राक्षस म्हणजे भारतीय वंशाचे मूळ लोक , जे दिसायला सावळे होते ) यांच्या मध्ये समुद्रमंथन झाले होते त्या मध्ये देवांना ( चांगल्या लोकांना - आर्य ) वाचवण्यासाठी शंकराने समुद्रमंथनातून मिळालेले विष प्राशन केले होते , ज्यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला.
पण वास्तविकता पहायला गेलो तर शंकर हे बोडो/किराट म्हणजे वनवासी जमातीचे राजा होते आर्य आणि यांच्यात नेहमी युद्ध होत असत , याच मूळ भारतीयांना राक्षस असे म्हंटले जायचे  ( racism was reached to its height ) . असे युद्ध असताना शंकराला कपट करून विष पाजण्यात आले , पण शंकराने ते पचवले पण त्यांचा कंठ कायमस्वरूपी निळा पडला, पण आपला फसलेला हा कपटी डाव लपवण्यासाठी हि कथा रचली गेली असावी . आणखी काही उदाहरण आहेत ती म्हणजे राजा महाबली , गुरुर अजून देव, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूचे गूढ हे देखील वंशवाद आणि जातीयवाद हेच होते .
भविष्यात आर्य ब्राम्हणांनी  शंकराला पौराणिक स्वरूप देऊन टाकले आणि श्रीराम यांना विष्णूचा अवतार म्हणून घोषित केले , यामुळेच भविष्यात भारतातील हिंदूंमध्ये फुट पडली आणि शंकराचे भक्त शैविक आणि विष्णूभक्त वैश्नाविक म्हणून विबागले गेले . इतिहासात शैविक आणि वैश्नाविक यांच्यात घमासान युद्ध हे पेटायचे .ज्या आर्य ब्राम्हणांनी हिंदू समाजात शैविक आणि वैश्नाविक अशी फुट पाडली ते स्वतहाला वैष्णविक म्हणवून घेतात .
आर्य ब्राम्हण लोकांनी शंकराला " महेश " अशी उपाधी देऊन त्यांना विनाशक ( Destroyer)  असे संबोधले आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. जो महादेव देव देवतांना वाचवण्यासाठी विष पिऊ शकतो , जो महादेव देव दानव मानव दैत्य भूत पिशाच्च चण्डाल हडळ या सगळ्यांवर प्रसन्न होतो तो विनाशक कसा काय . शंकराला " भोलेनाथ " म्हंटले जाते मग तो विनाशक कसा काय ? मुळात शंकराची भक्ती खूप अवघड असते ,अनेक पथ्य असतात अनेक शास्त्र असतात असे सांगितले जाते , कि जेणेकरून  सामान्य जनता शंकराची उपासना करणे बंद करेल . असे असूनही शिवलिंगाचे प्रमाण बाली ,सुमात्रा, जावा, सियाम,थायलंड , कंबोडिया ,विएतनाम या देशात सापडतात , वैष्ण्विक लोकं या क्षेत्रात खूप उशिरा आणि वेळेच्या मर्यादेत गेले . बाली हा असा एकमेव देश जिथे वैश्नाविक लोक सफल झाले . शंकराच्या महानतेमुळे हिंदू संस्कृती संपूर्ण भारतभर  दक्षिण पूर्व आशिया  , बलुचिस्तान, आफ्घानिस्तान आणि अमेरिकेतील काही प्रदेशात पसरली होती .  पुढे काही धर्मांध पौरोहीतांनी  शिवलिंग जे  पूर्वी जंगल, डोंगरात स्थापन केलेलं असायचे, त्याला मंदिरात स्थापन करणे चालू केले, बहुसंख्यांक भारतीय हिंदुंच्या धार्मिक्तेवर आपला रोजगार उभा करण्यासाठी त्यांनी शिवलिंगावर एक कलश थाटला त्याच्या बुडाला एक छिद्र केले आणि जेणेकरून त्यातून पाणी थेंब थेंब करून शिवलिंगावर पडेल. मग त्यांनी आपले पौरोहित्य चालू करून हळू हळू आर्य आणि शैविक संस्कृतीची भेसळ घडवली आणि संपूर्ण समाजाच्या धार्मिकतेचा फायदा उचलून आपले पौरोहित्य चालूच ठेवले .


शंकर एक महायोगी :-



आर्य हे कधीच मूर्तिपूजक न्हवते आर्य हे पंच तत्त्वांना आपले दैवत मानत होते , ते यज्ञ करायचे , मंत्रोच्चार करायचे , भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश यांना दैवत मान्यचे , पाप पुण्य , स्वर्ग - नर्क  ह्या तत्त्वांवर आधारित असायचे . पण शंकर हे महायोगी होते , ते योग, ध्यान लावायचे , मोक्ष आणि कर्म यावर त्यांचे तत्त्व आधारित होते . शंकराला वेद आणि उप्निषेध यांचे ज्ञान होते , त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रसार केला पण शांतपणे , वेद आणि उपनिषेध यांचे गूढ नंतर आलेल्या आर्य ऋषींना कधीच उलगडले नाही , आणि ते नेहमीच म्हणत राहिले कि " वेद हे अलिखित आहेत ". काही आर्य लोकांनी शंकराचे  ज्ञान ओळखले होते, आणि त्यांनी महादेवाला सर्व देवांच्या वरती स्थापन केले .त्यांनी शंकराचे ज्ञान  आत्मसात करणे चालू केले आणि ज्यांना ज्या प्रमाणे ज्ञान प्राप्त झाले त्यांना " ऋषी,देवर्षी , ब्रम्हर्षी,आणि ज्यांना सगळ्यात कमी ज्ञान त्यांना आचार्य " अशी पदवी देण्यात आली .

  महादेवाचे भक्त शैविक हे ते जे जठाधारी असतात, हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन असतात , रुद्राक्ष धारी असतात , निर्वस्त्र दिगंबर असतात , जे योग करतात, ध्यान धारणा करतात , ते हिमालयात अथवा मोठ मोठ्या डोंगरात आढळतात.
वैष्णाविक साधू ते , जे मुंडन करून असतात , शेंडीधारी असतात, गळ्यात जानवे असते , हातात पोथी/पुराण असतात , कमरे खाली पांढरे धोतर नेसून असतात , जे होम हवन यज्ञ करतात .जे मंदिरात पूजा पाठ करताना आढळतात .
मी इथे महादेवा बद्दल माहिती आपल्या समोर मांडली आहे . आपल्या सर्वांना शेवटी अशी विनंती करतो कि शंकराला महेश म्हणू नका .

स्त्रोत :-
१)     http://books.google.com.om/books?id=cip-3w1SGWAC&pg=PP1&lpg=PP1&dq=unspoken+history+of+india&source=bl&ots=qp_-AmvKUF&sig=GITQy2bcvDob59m_poj5p8E1FsA&hl=en&sa=X&ei=cXaiUI-1Jce8rAfK6YDYDg&ved=0CD0Q6AEwBg#v=onepage&q&f=false

२) http://www.kiratisaathi.com/blog.php?id=474



No comments:

Post a Comment