Friday, November 16, 2012

एक आदमी मच्छर को ......... बना देता है !

एक आदमी मच्छर को ....... बना देता है !



 
माणूस  आणि मच्छर यांच्या  मधलं नातं तसं युगा युगांचं आहे , ज्या दिवसा पासून माणूस झोपला , त्याच दिवसा पासून मछरांनी माणसाच्या डोक्यावर  फिरून गुणगुणत त्याची झोप खराब करून त्याला चावायला सुरवात केली , माणूस हि गाढ झोपेत असल्यामुळे त्याला कळलेच नाही कि किती आणि कधी मच्छरांनी आपले रक्त शोषले , माणसाने मछरांना  कंटाळून शेवटी जंगल सोडून शहर गाठलं , तर मच्छर शहरात पण येऊन धडकले , आत्ता मात्र माणसाने त्यांना संपवायला अनेक प्रकारचे , स्प्रे, मच्छर कोईल ,अंगाला लावायच्या ट्यूब, मच्छरदाणी शोधून काढल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, या उलट ह्या सगळयांन विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवून मच्छर अधिक धीट झाले , शेवटी माणसाने कंटाळून त्यांना आपल्या घरातील सदस्य बनवून घेतले , ह्याचा परिणाम असा झाला कि म्हणतात ना जर   दोन प्राणी एकत्र राहू लागले तर त्यांच्यात बऱ्याच गोष्टींची आणि विचारांची देवाण घेवाण होते आणि काही कालांतराने दोघांमध्ये खूप काही साम्य येते , त्याच प्रमाणे मच्छर आणि माणसात हि दीर्घ काळ एकत्र राहिल्याने अनेक साम्य आले .माणूस मच्छर कडून रक्त  शोषण करायला शिकला , मालक नोकराचे, श्रीमंत गरीबाचे, शक्तिशाली निर्ब्लाचे ,नेता जनतेचे आणि लोक्तांत्राचे , ज्याला जिथे संधी मिळाली लागला रक्त शोषण करायला ,हा गुण होता जो माणसाला मच्छर  कडून मिळाला .
आत्ता आपण मच्छरांबद्दल बोलूया, मच्छरांनी हि माणसाकडून काही गुण ( अवगुण ) शिकले आहेत ,बस त्या दिवसापासून मच्छर जगतात हि हाहाकार माजला .मच्छरांची एकता भंग झाली , काही मच्छर दलबदलू नेते लोकांचे रक्त पिऊन आले आणि त्यांच्यात दलबदलू पणाचे गुण आलेआत्ता ते परत येऊन मच्छरांच्या पंतप्रधानाचे सरकार पाडायचा प्रयत्न करायला लागले,पंतप्रधान समजून गेला कि हे मच्छर दलबदलू नेते लोकांच  रक्त पिऊन आले आहेत म्हणून तो वैतागला , मच्छर पंतप्रधानाने त्या त्या दलबदलू मच्छरांना  वैदकीय तपासणीसाठी  डॉ. मच्छर कडे पाठवले, डॉ.मच्छर पण भ्रष्ट  डॉ. चं रक्त पिऊन आला होता आणि त्याच्यात पण तसेच गुण होते , तो पण आत्ता इलाजाच करून जास्त पैसे उकळत होता आणि पोटात दुखत असेल तर शस्त्रक्रिया करून किडनी काढून विकत होता , दलबदलू मच्छरां मध्ये आत्ता पर्यंत  दलबदलू नेते लोकांचे सगळे गुण आले होते, त्यांनी डॉ.मच्छर बरोबर  सेटिंग केली, त्याला  मंत्रीपद देण्याचे आश्वासन  दिले आणि पंतप्रधानाला वेडा असल्याचे घोषित कर म्हणून सांगितले, जेणे करून त्याचे सरकार खाली पडेल , पण मच्छरांच्या  पी.एम. ने पण  पोचलेला जुगाडू नेत्याचे रक्त प्यायले होते
,ते मच्छर काही करण्यां अगोदरच ह्या पीएम मच्छर ने त्या दलबदलू नेत्यांना आणि त्या डॉ. ला ठीकाण्यावर लावले  आणि आपले सरकार वाचवायला त्या मच्छर पार्टी सोबत हात मिळवणी केली ज्यांचे चेहरे पण त्याला बघायला आवडत न्हवते  . जुगाडू नेत्याचे रक्त पिऊन पिऊन तो पण खुर्चीच्या राजनीती मध्ये माहीर झाला होता .

 




आत्ता महिला  मच्छरांची कथा बघा , महिला मछरांनी  सासू सुनेच्या मालिकेत काम करणाऱ्या नट्यांचे रक्त प्यायले होते, म्हणून त्या पण कट रचण्यात माहीर झाल्या होत्या ,आत्ता माणसाचे रक्त पिण्यात त्यांना रस राहिला न्हवता, आत्ता त्या एकमेकींचे  रक्त प्यायला लागल्या होत्या ,मच्छर सासू मच्छर सुनेला कसे कमी दाखवेन ह्या नादात होती, तर मच्छर सून सासूला देवाघरी कशी पाठवू ह्या प्रयत्नात होती .

मच्छर  वर्गात मानवीय गुण ( अवगुण ) आल्यापासून हा समाज पण उध्वस्त झाला. उच्च वर्ग  कनिष्ठ वर्गाचे हक्क मारण्यात मग्न झाला , पण कनिष्ठ मच्छर वर्ग पण कमी न्हवता , कनिष्ठ मच्छर वर्ग पण आत्ता  आरक्षणाचे आंदोलन करण्यात मग्न झाला , पूर्वी मच्छर स्वतंत्रपणे रक्त पीत होते पण आत्ता काय झालं आरक्षणाच्या कोत्या मधून रक्त प्यायला लागले ,भ्रष्ट म्छ्रांनी ह्याच्यात पण  लाच घेणे चालू केले . आत्ता रक्त पिण्यासाठी  ह्या  मछरांना  लाच द्यावी लागत होती . मच्छरां मध्ये पण  जलौ वृतीई, चीड, राग इर्ष्या अश्या भावना आल्या होत्या आणि ते  आत्ता एकमेकांचे रक्त  प्यायला लागले होते .आत्ता मच्छरां मध्ये पण काही चोर उच्क्के, गुंड ,मवाली , भाई टाईप मच्छर  जन्माला आले होते , हे मच्छर  " रक्त जमा केंद्रातून "   रक्ताच्या पिशव्या लुटू लागले , हे तेच " रक्त जमा केंद्र " होते जिथे इतर मच्छरांनी अनेक वर्षापासून माणसाचे रक्त पिऊन पिऊन जमा केले होते .भाई टाईप चे मच्छर  सर्वसाधारण मच्छरांकडून  आत्ता हफ्ता वासूली करायला लागले .

तसेच भेसळखोर  मच्छर रक्तात पाणी मिसळून दुकानावर विकत होते , ह्या मुले मच्छरांचे  स्वास्थ्य खराब  व्हायला लागले  आणि पूर्वीपेक्षा आत्ता मच्छर  निर्बल आणि अशक्त झाले होते , आत्ता पूर्वी सारखे ते माणसाच्या डोक्यावर भिनणभिण करत न्हवते , कोणीही मरियल माणूस येऊन त्यांना मारत होता . ह्याच अशक्तपणामुळे पूर्वी जे मच्छर  रोगराई पसरवत होते  आत्ता स्वतहाच आजारी पडत होते . माणसाचे रक्त पिण्या ऐवजी आत्ता ते बाटलीतले रक्त प्यायला लागले . बाटलीतले रक्त कमी दर्जाचे असल्यामुळे आत्ता मच्छर मधुमेहाचे  शिकार होऊ लागले , आणि ह्यामुळे  भ्रष्ट डॉ.मच्छरांचे  दवाखाने एकदम जोरात चालायला लागले होते .
तरूण मच्छरांची तर काय चांदीच होती ,तरून मादा मच्छरांनी  जेव्हा पासून करीना कपूरचे रक्त प्यायले , त्या पण फिगर  सांभाळण्याच्या नादात अडकल्या . त्या पण आत्ता एकदम सलीम-ट्रीम  होण्यात मग्न झाल्या. तरूण युवा मच्छर तर सलमान आणि हृतिक  चे रक्त पिऊन आले होते, ते पण बस बॉडी बनवण्यात मग्न झाले , जेणेकरून मादा मच्छर ना कसे आकर्षित करता येईल ह्या विचारात . एक  वयोवृद्ध मच्छर  बाजूला एका कोपऱ्यात बसून हे सगळं बघत होता , ह्या म्हाताऱ्या मच्छर ने माणसाचे रक्त न पिण्याचा ध्यास उचलला होता , त्यामुळे त्याच्या अंगी माणसाचे गुण  ( अवगुण ) आले न्हवते . इतर मच्छरांचा  हा नाद  बघून त्याने पण आपला प्रण मोडला आणि एका अश्या म्हाताऱ्या माणसाचे रिक्त पिऊन आला ज्याच्या अंगात  ८० व्या मध्ये पण जवानी  कुटून कुटून भरली होती . आत्ता त्याला पण ह्या उतार वयात लग्न  करण्याचे वेध लागले . त्याने पण  मेट्रीमोनी  साईट वर आपले नाव नोंदवले  आणि शोध चालू केला .


हे सगळं बघून इतर जनावरे गाय,बैल,बकरी कोंबड्या दचकून गेली, त्यांनी  मच्छरांची झालेली  हि दुर्दशा पहिली , आणि विचार केला, आपण ह्या माणसापासून लांबच राहूया  नाहीतर उद्या आपले पण हेच हाल होतील , आपण माणसाचे गुण  ( गुण ) कधीच न घेण्याचा  इतर प्राण्यांच्या  पंचायतींनी  कडक निर्णय घेतला , जो कोणी माणसाचे गुण ( दुर्गुण ) घेऊन येईल त्याला २४ तासाच्या आत फाशी , असा एक न्याय  जाहीर केला .


Thursday, November 15, 2012

शिव आणि शंकर

!! ॐ !!
आपल्यापैकी खूप जणांचा असा समज आहे कि शिव म्हणजे ज्याची भक्ती शिवलिंग या रुपात केली जाते तो आणि शंकर हे एकच आहेत . मला हि असेच वाटायचे , पण असे नाही शिव आणि शंकर या २ वेगळ्या गोष्टी आहेत .
"शिव " हि एक महाशक्ती आहे , ती निराकार आहे ती अशारीरिक उर्जास्त्रोत  आहे . ज्याप्रमाणे हवा आहे पण हवा दिसत नाही ,तिचे वादळ रुपात शक्तीप्रदर्शन होते, उष्णता आहे ती दिसत नाही , पण तिचे चटके लागतात अश्या अनेक लहान मोठ्या शक्ती या वातावरणात आहेत ज्या आहेत पण आपल्याला दिसत नाही , पण योग्य प्रकारे योग, ध्यान धारणा करून त्या शक्ती आपण आत्मसात करू शकतो . शिव हि या सगळ्या शक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे , ती दिसत नाही पण ती आहे, ती महाशक्ती ब्रम्हांडाच्या उत्पत्तीचे केंद्र आहे . हल्लीच एक संशोधन झाले होते " बोसोन " कणांचा , म्हणजे देवकणांचा . त्या संशोधनातून देवाच्या देवत्त्वाचीच परीक्षा आहे, पण अजूनही ते सिद्ध झाले नाही , भविष्यात हा प्रयोग कितपत प्रगत होणार आहे हे आत्ताच सांगता येत नाही .



 "शंकर " हे त्या म्हाश्क्तीचे एक साकार रूप आहे . ज्याप्रमाणे आपले शरीर आहे,हाडा मांसाचे  पंचतत्त्वांनी बनलेले त्याच प्रमाणे शंकर हे शिवाचे एक साकार रूप आहे . शंकराची कुठे हि प्रतिमा बघा तो शिवलिंगा समोर ध्यान लावून बसलेला दाखवला जातो , योग करताना दाखवला जातो , योग आणि ध्यान धारणा करून शंकराने शिव ह्या महाशक्तीला प्रसन्न केले होते , आणि ब्रम्हांडात असलेल्या त्या अनेक अमानवीय शक्ती अवगत केल्या होत्या. शंकर हा जाठाधारी आहे, गळ्यात नाग आहे, हातात त्रिशूळ आहे, डमरू आहे , तो रुद्राक्ष धारण करून आहे . त्याच्या अंगावर कोणते हि दागदागिने नाही , तो कमरे खाली वाघाचे कातडे नेसून आहे , असे म्हंटले जाते कि तो त्रिनेत्री आहे. शंकराचा  तिसरा डोळा म्हणजे त्याच्याकडे असलेल्या त्या अमानवीय शक्तींचे प्रतिक आहे ज्या शक्ती सामान्य माणसाकडे नाही . त्रिशूळ हे आधुनिक पद्धतीचे शस्त्र आहे , साडेतीन वेटोळे घातलेला नाग हा कुंडलिनी च्या  साडेतीन चक्रांचा प्रतिक आहे , कुंडलिनी हि सर्पा प्रमाणे आहे , कारण कुंडलिनी जागृत करण्यासाठी पंचेन्द्रीयांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे , अथवा ते घातक ठरू शकते , रुद्राक्ष धारण करण्यामागे हि शास्त्र आहे , जे त्याकाळात शंकराला माहिती होते , डमरू हे संगीताचे प्रतिक आहे , शंकर हा संगीताचा  देव आहे, नृत्याचा देव आहे म्हणून तो नृत्य करताना नटराज म्हणून हि ओळखला  जातो. तो देवांचा हि देव आहे तो महादेव आहे  .
आत्ता पर्यंत तुम्हाला शिव आणि शंकर यातील फरक लक्षात आला असेल . आत्ता आपण माहिती घेऊया  शंकरा बद्दल . काहींना हि माहिती अपवादात्मक वाटेल हि, मला जी माहिती मिळाली ती मी आपल्यासमोर मांडत आहे , मी फक्त मला मिळालेली माहिती आपल्या समोर मांडत आहे , कितपत विश्वास ठेवावा अथवा न ठेवावा हे आपल्यावर अवलंबून आहे .

                                                                        !! ॐ !!

आपल्या इतिहासतील अनेक योद्धे, घटना यांना धार्मिक आणि पौराणिक  स्वरूप देण्यात आले होते ते पुरोहित आणि शिक्षक वर्गाकडून  समाजावर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी , शंकर हे स्वतहा अनार्य होते , म्हणजे आर्य न्हवते , शंकराने पार्वती सोबत विवाह केला, पार्वतीचे वडील  हिमाचलप्रदेश  वर राज्य करायचे , पार्वती आर्य होती , शंकर पार्वती यांचा विवाह पार्वतीच्या कुटुंबियांना व आजूबाजूच्या अनेक आर्य राज्यांना मान्य न्हवता . त्यांच्या अवमानाला आणि विरोधाला न जुमानता पार्वतीने शंकरा सोबत विवाह केला, कारण पार्वतीला दृढ विश्वास होता कि शंकर हे बलशाली आहेत , शंकराकडे त्या शक्ती आहेत ज्या तिच्याच कुळवंशातील इतर राजकुमारांकडे न्हवत्या . शंकर आणि पार्वती यांना २ पुत्र होते , गणपती आणि कार्तीक्ये . गणपती आणि कार्तीक्ये हे आपल्या सारखेच हाडा मांसाचे होते, ते होते . गणपती हा ज्ञानी, विद्वान आणि बुद्धिमान होता , त्याच्या बुद्धिमत्तेचे प्रतिक म्हणून हत्तीचे तोंड दाखवले जाते . पण गणपतीच्या ज्ञानाला झाकण्यासाठी एक काल्पनिक कथा रचून टाकली गेली जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कि गणपतीला हत्तीचे डोके कसे लावले गेले . गणपती आणि कार्तीक्ये या दोघांना आपल्या वडिलांकडे असलेल्या सर्व अध्यात्मिक शक्ती अवगत होत्या , अध्यात्मिक ज्ञान, विज्ञान,शास्त्र,वेद, आयुर्वेद या सगळ्यांचे ज्ञान पुरेपूर होते . शंकराने त्या दोघांना संपूर्ण प्रशिक्षण आणि ज्ञान दिले होते . आपल्या वडिलांकडून मिळालेल्या शक्ती आणि ज्ञान यांचा प्रसार  या दोघांनी संपूर्ण देश आणि देशा बाहेर केला . कार्तीक्येने बहुदा दक्षिण भारता च्या दिशेने  आपल्या ज्ञानाचा प्रसार केला , म्हणून कार्तीक्ये दक्षिण भारतात सुब्रामनियाम आणि मुरुगन या नावाने ओळखला जातो . या दोघांनीच बहुदा सर्वप्रथम शंकराच्या ज्ञानाचा प्रसार केला . पौराणिक कथा मध्ये असे हि म्हंटले जाते कि कार्तीक्ये याने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली होती ........ हे वाक्य हेच दर्शवते कि कार्तीक्येने शंकराच्या ज्ञानाचा प्रसार संपूर्ण जगभर केला , याचेच फ्ल्रूप आज इंडोनेशिया, जपान, पेरू,ब्राझील,मलेशिया,उरुग्वे दक्षिण अमेरिकेत आणखी हि अनेक देशात शिवलिंग सापडले जाते . पण आर्य लोकांच्या हातात नियंत्रित असलेला इतिहास यांच्या पासून वंचित राहिला , शंकराच्या जवळीक राहून मिळालेल्या पाठबळामुळे या दोघांच्या  कौशलल्याने संपूर्ण भारत देशाला खऱ्या अध्यात्मिकतेमध्ये बदलून टाकले . एक अशी आस्था, योग , ध्यान ,आराधना जी पुढील ६००० वर्षात बदलू शकलेली नाही , आजतागायत जिवंत आहे , निव्वळ जिवंत नाही तर दिवसेंदिवस आणखी वाढू लागली आहे . तरीपण आर्य लोकांनी या चौघांना पौराणिक कथांमध्ये गुंडाळून काल्पनिक स्वरूप देण्याचे काम पुरेपूर करून ठेवले आहे .

पार्वतीच्या वडिलांचे हिमालयन राजांची माहिती गायब आहे , पण पार्वतीचे वडील हे नेपाळ प्रदेशात राज्य करत असावेत आणि शंकर याच राज्यात हिमालयातील पर्वतान मध्ये अथवा आजच्या उत्तरप्रदेश बिहार नजीकच्या सीमेलगत पठारावार वास्तव्यास होते .



वेद आणि शंकर :-
ऋगवेदा मध्ये आर्य संस्कृतीने मांडलेल्या  देव देवांची नावे अशी आहेत :- इंद्र, अग्नी ,वरुण, बृहस्पती,ब्रह्मा,अरुंधती , सोम, वायू , अश्विन ,रितू  , मारुत , रुद्र , रिभस, सवितर ,ब्राम्हनास्पती . पण आज भारतामध्ये  हिंदू समाज यापैकी कोणत्याही  देवतांची आराधना करताना दिसत नाही . ब्रम्हदेवाचे एकच मन्दिर आहे पुष्कर राजस्थान मध्ये , पण त्याच्या साठी वर्षातला असा एक हि दिवस आयोजित नाही .
सर्वात जास्त प्रमाणात ज्या देवतांची आज पूजा आणि उत्सव साजरे केले जातात ते आहेत :-
१) शंकर आणि त्यांचे अविर्भाव
२) पार्वती आणि त्यांचे अविर्भाव
३) शंकर आणि पार्वती यांचे  पुत्र  गणपती , कार्तीक्ये

४) विष्णू आणि त्यांचे अवतार .
५) अनेक महामानव गुरु ज्यांना कोणत्या न कोणत्या देवाचा अवतार मानले आहे .


सिंधू संस्कृती चे देव :-


सगळ्यात पुरातन मानली जाणारी सिंधू संस्कृती , म्हणजे हडप्पा आणि मोहेन्जदाडो येथील  उत्खननात मुख्यत्व्ये पशुपतीनाथ देवता सापडते , पशुपतीनाथ म्हणजेच आज आपण ज्याला शिव /शंकर मानतो . डोक्यावर शिंग असलेले मुकुट, योग धारणा करणारा आणि आजूबाजूला वाघ, हरण, म्हैस, आणि हत्ती , त्याच बरोबर एक लाल भर्या रंगाची मातीची देवी सुद्धा सापडली आहे . सिंधू संस्कृतीचे लोक याच देवतांची भक्ती करत असत .याचा अर्थ असा कि सिंधू संस्कृती दरम्यान आर्य देव देवता भारतात अस्तित्वात न्हवत्या

शंकराचे उद्गम स्थान :- 



शिव या शब्दाचे मूळ किराट अथवा बोरोक जमाती मध्ले आहे असे किराट जमातीचे मानणे आहे . नेपाल मधील किराट नावाची एक आदिवासी जमात आहे , त्यांचे मानणे आहे कि शंकर हे एक किराटी राजा होते .

शिवा हा शब्द वेदांमध्ये कुठेच आढळत नाही, शिवा हा शब्द किराट भाषेतील " सीमानी " म्हणजे ज्ञान आणि " कैबा " म्हणजे पाच म्हणजेच सी + बा = सिबा > सिवा >सिबराई. म्हणजे तो देव ज्याला जीवनाच्या ५ तत्त्वांचे ज्ञान आहे .म्हणजे पृथ्वी अग्नी जल,वायू, आणि आकाश जे खूप मोठे अथवा महत्त्वाचे आहे .

बहुतेक त्रिपुरी भाषेत शंकराला " किराटेशवर " जे म्हणतात बहुदा किराट लोकांचा देव म्हणून हि बोलत असावेत .त्याचंचे दुसरे नाव आहे " होर " होर या शबदाचा कुठला हि संस्कृत अर्थ नाही . पण बोरोक/किराट भाषेत होर म्हणजे अग्नी ज्या नावाला शंकर पात्र आहेत . बोरोक/किराटी लोकं  " होर होर भोम भोम " म्हणून हि एक नारा देतात ,ज्याचा अर्थ अग्नीच्या ज्वाला असा आहे . बहुदा पुढे याच" होर होर भोम भोम "शंकराला त्रिपुरेश्वर अथवा त्रिपुरारी असे हि म्हणतात . कारण शंकराने त्रिपुर च्या राजाचा वध केला होता . या सर्वातून हे स्पष्ट होते कि स्थानिक बोरोक/किराट आदिवासी समाज म्हणजे आर्य संस्कृतीच्या वेढ्यातून बाहेर राहिलेला समाज आहे, पण ते शंकराची भक्ती करतात म्हणजेच ते हिंदू आहेत पण आर्य नाही .





पार्वतीचे उद्गम स्थान :- 

पार्वती ( पर्वत + इति ) हा शब्द किराट/बोरोक शब्द " हिच्वाक मां " डोंगरांची देवी,  याचे अनुवादन आहे .आणि आर्य लोकांनी याच नावाने त्यांची भक्ती केली . या देवतेचे अथवा तिच्या कोणत्या हि रूपाचे वेदांमध्ये कुठे हि विश्लेषण नाही.
अनेक पौराणिक कथांमध्ये पार्वतीच्या जन्मा बद्दल अनेक वेगवेगळ्या कथा आहेत , यातून हे स्पष्ट होते कि पार्वती हि देवता बोरोक हिंदूं वंशाची  देवता आहे. त्रिपुरी पौराणिक कथांच्या आधारे पार्वती हि उंच डोंगराळ प्रदेशातली देवता आहे , आज हि जंगलानंमध्ये तिची पूजा केली जाते . पहायला गेलो तर कोणते हि आर्य उंच डोंगर अथवा जंगलात वास्तव्यास होते असे आढळत नाही . त्याच प्रमाणे किराट / बोरोक जमात आजही डोंगर आणि जंगलात राहणे पसंत करते .म्हणूनच शंकर पार्वती मधील पार्वती अथवा वैष्णोदेवी , चामुंडा,हाडीमबा, हिमालयात उंच पर्वतावर विराजित आहे .यावरून हे स्पष्ट आहे कि पार्वती हे दैवत आर्य नसून मूळ हिंदू आहे . आत्ता वर सांगितल्याप्रमाणे असे हि असू शकते पार्वतीने शंकरा सोबत लग्न केल्यानंतर शंकराकडून मिळालेल्या अध्यात्मिक ज्ञानामुळे आणि शंकराच्या सहवासात राहिल्यामुळे तिला हि त्या सर्व शक्ती आणि ज्ञान पारंगत झाले होते म्हणून तिला हि देवत्त्व प्राप्त झाले . 
पार्वती चे दुसरे नाव आहे उमा ," उमा " हे नाव सुद्धा वेदांमध्ये कुठेच सापडत नाही पण हे नाव पुराणात मात्र आहे . मुळात किराटी लोकं त्रिपुरेश्वरी देवीला अम्मा किंवा सकानी अम्मा , म्हणजे दक्षिणेची देवी असे हि म्हणतात , आपण जर माझा " कुमारी कंदम " हा ब्लॉग वाचला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल कि अम्मा हा शब्द नेपाल मध्ये कसा काय गेला तो हि ६००० वर्षांपूर्वी पासून . पुढे अम्मा या शब्दाचा आर्य लोकांनी उच्चार निट न जमल्यामुळे किंवा आणखी काही कारणांमुळे फेरबदल करून  " उमा " असा केला आणि प्रतीकात्मक पार्वतीला दाखवले.यावरून काहीही वेडी वाकडी वळण न घेता हा अर्थ स्पष्ट होतो . याच प्रमाणे  " काली " हा रायंग उपभाषेतील  शब्द स्व्काल (swkal) म्हणजे जादुगरणी अथवा राक्षशीण आणि जेव्हा माणसाच्या रुपात येते तेव्हा  "बेडूवा " असे हि म्हंटले जाते . तर काली हा संस्कृत शब्द " स्व्काल" अथवा "  स्व्काली " या मधून उचलला आहे .म्हणून काली मातेची पूजा जंगलात केली जाते . जाडी टोणा सारख्या अमानवीय शक्तींचा प्रयोग करण्यात केली जाते .ज्या शक्ती जंगलात राहणाऱ्या या जमातींना अवगत होत्या आणि आजही आहेत पण आर्य वंशातील लोकांना या सर्व विद्या आज हि माहिती नाही .
लक्ष्मी हे नाव देखील याच प्रकारे आले आहे किराटी लोक तांदूळ आणि धन यांच्या देवतेला मैलुमा ९ मिळू + अम्मा ) म्हणतात जिला मोक्शुमा ( मोक्षु + अम्मा ) असे हि म्हणतात , पण आर्य लोकांनी मोक्शुमा या शब्दातील " म" काढून त्याला " ल" जोडला आणि पुढे लोक्षुमा > लक्षुमी . असे झाले .


गणपती चा उद्गम :-
गणपती हे नाव सुद्धा वरील सांगीत्ल्या प्रमाणेच आहे . गणपती हा  "गोरिया  " नामक मंगोलि देव आहे .मंगोलि  संस्कृती मध्ये गोरिया  देखील शंकर आणि पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जातो  . इथे पण गणपती हे दैवत वेदांमध्ये कुठे हि नाही . याचा अर्थ असा कि गणपती हे आर्य दैवत नाही , त्रिपुरातील गोरीया हे हेच दैवत आहे .गणेशाचे दुसरे नाव आहे बिनायक दुसर्या बाजूला पाहता बाबा गोरिया हे " बिनैरोक " (Binairok)  म्हणून ओछाई (Ochai) जमाती तर्फे पूजले जाते  . यातून हेच कळते कि गोरिया आणि गणेश हे एकच आहेत.  

कार्तीक्ये चा उद्गम :-
कार्तीक्ये हा गणेशाचा लहान भाऊ , आणि शंकर आणि पार्वतीचा पुत्र .म्हणून कार्तीक्ये हि किराट लोकांचेच दैवत . कार्तीक्येचे नाव हि वेदांमध्ये नाही म्हणून कार्तीक्ये हि आर्यांचे दैवत नाही .त्रिपुरी पौराणिक कथांप्रमाणे कालियाहा देव  गोरिया चा लहान भाऊ . पौराणिक सांसृतिक भेसळ झाल्यामुळे कालिया हे नाव कार्तीक्ये झाले असेल यात शंका नाही.


या सर्व गोष्टींना दुजोरा मिळावा म्हणून काही उदाहरणे देत आहे :-

१) वर्ष 1500 AD मध्ये राजा धन्या माणिक्य ने उदैपूर येथील त्रिपुरेश्वरी मंदिरा उभारले आहे .पण आत्ता हे मन्दिर पुराणात नोंद करून याला ५१ पीठांपैकी  ते पीठ मानले जाते जिथे सुदर्शन चक्राने पार्वतीच्या शरीराच्या ५१ तुकड्यांपैकी उजव्या पाय पडला होता .
२) गुवाहाटी येथील कामाख्या हे मन्दिर देखील याच प्रमाणे  कोच ( बोडो जमातीच्या  ) राजाने बांधले होते .हे देखील ५१ पिठांमध्ये सामील केले गेले आहे असे म्हंटले जाते या ठिकाणी पार्वतीचे गुप्तांग पडले होते  



 शंकर आणि वास्तविकता :- 




पुराणांमध्ये शंकराला निळकंठ असे म्हंटले आहे , म्हणजे ज्यांचा कंठ नीला आहे तो . अशी एक पौराणिक कथा प्रचलित केली गेली आहे कि देव आणि राक्षस ( इथे देव म्हणजे आर्य आणि राक्षस म्हणजे भारतीय वंशाचे मूळ लोक , जे दिसायला सावळे होते ) यांच्या मध्ये समुद्रमंथन झाले होते त्या मध्ये देवांना ( चांगल्या लोकांना - आर्य ) वाचवण्यासाठी शंकराने समुद्रमंथनातून मिळालेले विष प्राशन केले होते , ज्यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला.
पण वास्तविकता पहायला गेलो तर शंकर हे बोडो/किराट म्हणजे वनवासी जमातीचे राजा होते आर्य आणि यांच्यात नेहमी युद्ध होत असत , याच मूळ भारतीयांना राक्षस असे म्हंटले जायचे  ( racism was reached to its height ) . असे युद्ध असताना शंकराला कपट करून विष पाजण्यात आले , पण शंकराने ते पचवले पण त्यांचा कंठ कायमस्वरूपी निळा पडला, पण आपला फसलेला हा कपटी डाव लपवण्यासाठी हि कथा रचली गेली असावी . आणखी काही उदाहरण आहेत ती म्हणजे राजा महाबली , गुरुर अजून देव, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूचे गूढ हे देखील वंशवाद आणि जातीयवाद हेच होते .
भविष्यात आर्य ब्राम्हणांनी  शंकराला पौराणिक स्वरूप देऊन टाकले आणि श्रीराम यांना विष्णूचा अवतार म्हणून घोषित केले , यामुळेच भविष्यात भारतातील हिंदूंमध्ये फुट पडली आणि शंकराचे भक्त शैविक आणि विष्णूभक्त वैश्नाविक म्हणून विबागले गेले . इतिहासात शैविक आणि वैश्नाविक यांच्यात घमासान युद्ध हे पेटायचे .ज्या आर्य ब्राम्हणांनी हिंदू समाजात शैविक आणि वैश्नाविक अशी फुट पाडली ते स्वतहाला वैष्णविक म्हणवून घेतात .
आर्य ब्राम्हण लोकांनी शंकराला " महेश " अशी उपाधी देऊन त्यांना विनाशक ( Destroyer)  असे संबोधले आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. जो महादेव देव देवतांना वाचवण्यासाठी विष पिऊ शकतो , जो महादेव देव दानव मानव दैत्य भूत पिशाच्च चण्डाल हडळ या सगळ्यांवर प्रसन्न होतो तो विनाशक कसा काय . शंकराला " भोलेनाथ " म्हंटले जाते मग तो विनाशक कसा काय ? मुळात शंकराची भक्ती खूप अवघड असते ,अनेक पथ्य असतात अनेक शास्त्र असतात असे सांगितले जाते , कि जेणेकरून  सामान्य जनता शंकराची उपासना करणे बंद करेल . असे असूनही शिवलिंगाचे प्रमाण बाली ,सुमात्रा, जावा, सियाम,थायलंड , कंबोडिया ,विएतनाम या देशात सापडतात , वैष्ण्विक लोकं या क्षेत्रात खूप उशिरा आणि वेळेच्या मर्यादेत गेले . बाली हा असा एकमेव देश जिथे वैश्नाविक लोक सफल झाले . शंकराच्या महानतेमुळे हिंदू संस्कृती संपूर्ण भारतभर  दक्षिण पूर्व आशिया  , बलुचिस्तान, आफ्घानिस्तान आणि अमेरिकेतील काही प्रदेशात पसरली होती .  पुढे काही धर्मांध पौरोहीतांनी  शिवलिंग जे  पूर्वी जंगल, डोंगरात स्थापन केलेलं असायचे, त्याला मंदिरात स्थापन करणे चालू केले, बहुसंख्यांक भारतीय हिंदुंच्या धार्मिक्तेवर आपला रोजगार उभा करण्यासाठी त्यांनी शिवलिंगावर एक कलश थाटला त्याच्या बुडाला एक छिद्र केले आणि जेणेकरून त्यातून पाणी थेंब थेंब करून शिवलिंगावर पडेल. मग त्यांनी आपले पौरोहित्य चालू करून हळू हळू आर्य आणि शैविक संस्कृतीची भेसळ घडवली आणि संपूर्ण समाजाच्या धार्मिकतेचा फायदा उचलून आपले पौरोहित्य चालूच ठेवले .


शंकर एक महायोगी :-



आर्य हे कधीच मूर्तिपूजक न्हवते आर्य हे पंच तत्त्वांना आपले दैवत मानत होते , ते यज्ञ करायचे , मंत्रोच्चार करायचे , भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश यांना दैवत मान्यचे , पाप पुण्य , स्वर्ग - नर्क  ह्या तत्त्वांवर आधारित असायचे . पण शंकर हे महायोगी होते , ते योग, ध्यान लावायचे , मोक्ष आणि कर्म यावर त्यांचे तत्त्व आधारित होते . शंकराला वेद आणि उप्निषेध यांचे ज्ञान होते , त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रसार केला पण शांतपणे , वेद आणि उपनिषेध यांचे गूढ नंतर आलेल्या आर्य ऋषींना कधीच उलगडले नाही , आणि ते नेहमीच म्हणत राहिले कि " वेद हे अलिखित आहेत ". काही आर्य लोकांनी शंकराचे  ज्ञान ओळखले होते, आणि त्यांनी महादेवाला सर्व देवांच्या वरती स्थापन केले .त्यांनी शंकराचे ज्ञान  आत्मसात करणे चालू केले आणि ज्यांना ज्या प्रमाणे ज्ञान प्राप्त झाले त्यांना " ऋषी,देवर्षी , ब्रम्हर्षी,आणि ज्यांना सगळ्यात कमी ज्ञान त्यांना आचार्य " अशी पदवी देण्यात आली .

  महादेवाचे भक्त शैविक हे ते जे जठाधारी असतात, हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन असतात , रुद्राक्ष धारी असतात , निर्वस्त्र दिगंबर असतात , जे योग करतात, ध्यान धारणा करतात , ते हिमालयात अथवा मोठ मोठ्या डोंगरात आढळतात.
वैष्णाविक साधू ते , जे मुंडन करून असतात , शेंडीधारी असतात, गळ्यात जानवे असते , हातात पोथी/पुराण असतात , कमरे खाली पांढरे धोतर नेसून असतात , जे होम हवन यज्ञ करतात .जे मंदिरात पूजा पाठ करताना आढळतात .
मी इथे महादेवा बद्दल माहिती आपल्या समोर मांडली आहे . आपल्या सर्वांना शेवटी अशी विनंती करतो कि शंकराला महेश म्हणू नका .

स्त्रोत :-
१)     http://books.google.com.om/books?id=cip-3w1SGWAC&pg=PP1&lpg=PP1&dq=unspoken+history+of+india&source=bl&ots=qp_-AmvKUF&sig=GITQy2bcvDob59m_poj5p8E1FsA&hl=en&sa=X&ei=cXaiUI-1Jce8rAfK6YDYDg&ved=0CD0Q6AEwBg#v=onepage&q&f=false

२) http://www.kiratisaathi.com/blog.php?id=474



Monday, November 12, 2012

जातिवंत सांड






ह्या रांड मुंड वस्त्या , आणि हे सैरा वैरा बांध ,
वेशी पासून देशो देशी पसरलेले हे जातिवंत सांड,
उंबरा तुटलेली दारं, हि चौकटी फुटलेली घरं,
वांझ झालाय पाणीचा पूर, विजून गेलाय चुली मधला धूर ,
कोरड्या ठाक आभाळाचं हे मातीमोल गाराहानं,
कपाळ पांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं,
जन्म नागव्या पाठीवारचा हा चरचरणारा वळ,
दुख पांगळ्या पाया मधलं हे थरथरणारं बळ,

ह्या रांड मुंड वस्त्या , आणि हे सैरा वैरा बांध ,
वेशी पासून देशो देशी पसरलेले हे जातिवंत सांड,
शिवारा मधल्या शिवीला आणि जात्या मधल्या पोळीला,
गोठया मधल्या गाईला, आणि भानू सुकलेल्या आईला ,
परकर पोलक्या मधल्या ताईडीला,
आणि पाळी चुकलेल्या बाईडीला,
खांदा नसलेल्या कावडीला, आणि गळा सुकलेल्या बावडीला,
घे स्वप्नांच पिक नी जागा मिळल तिथं विक ,
विकलं गेलं तरीबी ठीक , नाहीतर जा कि मरण शिक,

ह्या रांड मुंड वस्त्या , आणि हे सैरा वैरा बांध ,
वेशी पासून देशो देशी पसरलेले हे जातिवंत सांड,
सेनेगल , सोमालिया, मेक्सिको, हैती ,
चंदीगड, शिमला, तीरुवानंथपूरम नाशिक नगर ची भावकी ,
कावे खुर्द, म्हसवे बुद्रुक मौजे कासारवाडा ठावकी ,
मका लांब पळत गेला , गायब झाली तूर ,
रान मुकं हुंबर वासाचं त्याचा हार्पून गेलाय सूर ,
कांदा लिंबू, मिरची कोथिंबीर, खुडता येत नाही आलं ,
माती मधलं पिवळं सोनं, कालं ठीप्कार झालं ,

ह्या रांड मुंड वस्त्या , आणि हे सैरा वैरा बांध वेशी पासून देशो देशी पसरलेले हे जातिवंत सांड


.......... पांगिरा

Saturday, November 10, 2012

कुमारी कंदम , भारताच्या ऐतिहासिक संस्कृतीचा जिवंत धागा



!! ॐ !!
आपल्या पैकी सगळ्यांनाच आपल्या इतिहासातले प्रत्येक रहस्य जाणून घेण्याची मनापासून ओढ असते , नैसर्गिक आहे ते . मी इथे आपल्याला मनुष्याची पहिली संस्कृती , भाषा कशी आणि कुठे उत्पत्तीस आली हे थोडक्यात सांगणार आहे .
"कुमारी कंदम " हे नाव जर तुम्ही तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या कोणत्या हि व्यक्तीस विचारले तर ते तुम्हाला असे उत्तर देतील , कि होय हे नाव ऐकले आहे, कन्याकुमारी ला अथवा तिथल्या प्रदेशाला कुमारी कंदम असे म्हंटले जायचे , तर काही जण म्हणतील होय अश्या नावाचा एक भूभाग होता, पण समुद्र देवतेने तो गिळून टाकला . तर याच नावाने अनेक दंत कथा हि आहेत. ज्या तुम्हाला फक्त तामिळनाडू मध्येच ऐकायला मिळतील . थोडक्यात काय तर या कथांचा कुठे न कुठे संबंध हा असतोच, आणि कुमारी कंदम चा इतिहास जडला आहे तामिळ संस्कृती आणि भाषेसोबत . 
१९९९ साली JOIDES Resolution नावाच्या शोध कर्त्या संस्थेने कुमारी कंदम ज्याला पाश्चात्य देशात  lemuria  असे हि म्हंटले जाते ह्या पाण्याखाली गेलेल्या भूभागाचे पुरावे शोधून काढले,तेव्हापासून हा विषय ऐरणीवर आला आहे .

चला तर आपण सुरवातीपासून बघुया , म्हणजे अगदी लाखो वर्षांपूर्वी पासून म्हणजे जेव्हा माणूस चिम्पान्झी पासून वेगळा झाला .

२.५ लाख वर्षांपूर्वी पृथ्वी म्हणजे एक अखंड भूखंड होता , ज्याला पान्गाई (  Pangaea) असे हि म्हंटले जायचे . त्या काळात मनुष्य उत्पत्ती न्हवती , भारतीय खंड ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटारटीका याला जोडला होता . त्या नंतर एक खूप मोठा प्रलय झाला ज्याला इंग्रजीत  Permian-Triassic extinction event असे म्हंटले जाते . महा भयंकर सुनामी , या नंतर जवळपास जमिनीवरील ७०% आणि जलाशयातील ९६% जीव सृष्टी नष्ट झाली . हा कालखंड इथेच समाप्त झाला, त्यानंतर जमिनीच्या भूगर्भात खूप मोठे बदल घडले, संपूर्ण पान्गाई (  Pangaea) भूखंड २ विभागात दुभाग्ला गेला , ज्याला लुरेशिया आणि गोन्द्वाना असे म्हंटले गेले आहे . दक्षिण अमेरिका, आफ्रिका , भारत, ऑस्ट्रेलिया , हे तुटून वेगळे झाले आणि दक्षिणेकडे सरकले .

 

पुढे हा भूखंड ४ विभागात एकमेकांपासून वेगळा झाला,दक्षिण अमेरिका, आफ्रिका , भारत, ऑस्ट्रेलिया. या भू-खंडांचा तुटण्याचा वेग होता १५००० वर्ष प्रती मैल .या प्रक्रियेला तामिळ भाषेत नाव्लाम थेरू असे म्हंटले जाते , ज्या मधून भारताचे निर्माण झाले .हा काळ होता , स्पाय्नोसोर (spinosaurs), कोएइलोसोर्स (coelurosaurs) आणि सित्ताकोसोर्स (psittacosaurs) चा . सुमारे ५००,००० वर्षां पूर्वीभारतीय खंड हा आशिया खंडाकडे सरकला आणि जोडला गेला ,हा तो काळ होता जेव्हा आधुनिक माणूस प्रगत होऊ लागला होता इथेच याच कुमारी कंदम खंडावरती. या काळात माणसाच्या कवटीची जाडी पातळ  होत गेली , हनुवटी आकारात आली, जीब पातळ झाली , मेंदू हि वाढला , आणि तो खाणाखुणा करून संभाषण करू लागला, हळू हळू तो बोली भाषेत बोलू लागला , याच भाषेला जगातील सर्व भाषांची जननी मानली जाते जिला आज आपण तामिळ भाषा म्हणून ओळखतो , आज तागायत जगातील अनेक भाषांमध्ये  या काळातील भाषेतले शब्द आढळतात .





कुमारी कंदम भौगोलिक आणि राजकीय :-
फ्रेंक जोसेफ (Secretary for Ancient American Association) यांनी आपल्या  “The Lost Civilization of Lemuria” पुस्तकात लेमुरीया नामक एका भूखंडाच्या असल्याचे सांगितले आहे, इंडोनेशीया मधील सुमारे २.५ लाख वर्ष जुनी एक सभ्यता.ते म्हणतात लेमुरीया आणि कुमारी कंदम हे दोन भूखंड वेग वेगळे आहेत जे भारताच्या दक्षिणेस होते.जोसेफ यांनी मोहेनजदाडो येथील लिपी हि १,००,००० लाख वर्षांपूर्वीची  इस्टर द्वीपावरील असण्याहे हि सिद्ध केले आहे . अनेक अब्यासाकांच्यामाहिती वरून त्यांनी मोहेनजादाडोची लिपी आणि तेथील पुरातन सभ्यता हि " मु " द्वीपावरील असल्याचे हि  सिद्ध केले आहे,"मु" हे द्वीप सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी पाण्या खाली गेले आहे .

इस्टर द्वीप  हे जपान च्या १००० मैल जवळ होते ,तिथे रोन्गो रोन्गो नामक एक लिपी होती , जी मोहेनजदाडो  च्या लिपी सोबत मिळती जुळती आहे . हे घडलं सुमारे १ ,००,००० वर्ष आधी .
सुनामी मुळे  "मु"  ज्याला लेमुरीया हि म्हंटले जाते , जे २.५ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशिया जवळ होते ,या द्वीपावरील लोकं नेहमीच मेक्सिकन समुद्रातील आटलांटीस आणि दक्षिण तामिळनाडू जवळील कुमारी कंदम वर जाऊन वसले . हे घडलं सुमारे १,००,००० वर्षांपूर्वी . याच द्वीपांवर मु लिपी आणि सभ्यता व्यवस्थित प्रगत झाली .पुढे सुनामी मुळे मु लोकं आटलांटीस वरून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर झाले ज्यांना अझेटेकस आणि इनकास म्हणतात .जे उत्तर अमेरिकेत स्थलांतर झाले त्यांना मेक्सिकन आणि रेड इंडियन म्हणतात .
कुमारी कंदम तामिळनाडू च्या दक्षिणेतून  जे मु लोकं १५,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत गेले त्यांना सुमेरियन आणि जे आफ्रिकेतून अरेबियात गेले त्यांना जीव (Jews) म्हंटले जाते .
पुढे सुनामी मुळे कुमारी कंदम वरून जे लोकं बंगाल कडे स्थलांतर झाले ते चोला आणि जे सिंध पंजाब कडे स्थलांतर झाले ते छेरा म्हणून ओळखले जातात .

कुमारी कंदम चा काळखंड आणि संसकृती साधारण पहिल्या शतकात प्रगत झाली .कुमारी कंदम या खंडाचा  भूभाग होता आजच्या भारताच्या दक्षिण टोका पासून , मदागास्कर (madagaskar ) च्या पूर्वेला आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia ) पश्चिमे पर्यंत पसरलेला . साधारणपणे आजच्या ऑस्ट्रेलियाच्या १/३ भूभाग . "पाहरुली आरु " (उत्तरेकडे) आणि "कुमारी " ( दक्षिणेकडे ) नावाच्या  नद्या  इथे असल्याचे म्हंटले जाते, " पाहरुली आरु " नदीच्या उत्तरेकडे स्थित होती  आजची कन्याकुमारी . कुमारी कंदम चा भूभाग हा ७०० कवतम/कवटम पाहरुली नदी पासून ते कुमारी नदी पर्यंत होता. कवतम/कवटम म्हणजे नक्की किती माप हे आजच्या आधुनिक युगात अज्ञात राहिले आहे . कारण हा भूभाग पाण्याखाली जाताना अनेक पुरावे कायमस्वरूपी नष्ट झाले . आधुनिक तंत्रज्ञाना प्रमाणे सुमारे  १४०० मैल ( २३०० कि.मी) ते ७०००  मैल ( ११००० कि.मी) म्हणजे सुमारे ६७००० चौ.मैल इतके असण्याची शक्यता आहे .




इथे पांडियन राजांचे साम्राज्य होते , त्यांचे राज्य ७ नाडू (नारळी ) प्रदेशात ( coconut territories) विभाजन केले गेले होते, प्रत्येक प्रदेश पुन्हा प्रत्येकी ७ विभागात , म्हणजे एकूण ४९ विभागात त्यांचे साम्राज्य विभाजित होते.  ७ एलुतेंगा नाडू (elutenga natu), ७ मदुराई प्रदेश ,एलूमदुराई नाडू  (elumaturai natu) , ७ वाळवंटी प्रदेश एलुमुन्पलाई नाडू  (elumunpalai natu), ७ नवीन वाळवंटी प्रदेश, एळूपिन्नपालई नाडू  (elupinpalai natu), ७ डोंगराळ प्रदेश , एलुकुन्रा नाडू  (elukunra natu), ७ समुद्र किनारपट्टी प्रदेश एलुकुन्कराई नाडू (elukunakarai natu) आणि ७  खजुरी प्रदेश , एळूकुरुम्पनाई नाडू  (elukurumpanai natu). असे सगळ्यांचे डोंगर आरण्यांचा  हा प्रदेश कुमारी कोल्लम .यातील २ प्रदेश म्हणजे आजचे कोल्लम आणि कन्याकुमारी जिल्हे .  .पुढे हा खंड खूप मोठ्या सुनामी मुळे संपूर्णपणे हिंद महासागराच्या पाण्याखाली गेला, आपला हरवलेला भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी पांडियन राजांनी भारताकडे म्हणजे उत्तर दिशेने वाटचाल केली , आणि  नवीन भूभाग  जिंकले (Maturaikkandam, verses 17-22)  म्हणजे आजचे  तामिळनाडू येथे स्थित झाले .मुळात तामिळ हा शब्द बंगाली शब्द ताम्र्लापिता किंवा ताम्र्लीपती यातून मिळाला आहे .ताम्र्लापिता हे बंगालच्या खाडीवरील एक शहर,असे हि म्हंटले जाते कि याच बंदरावरून मौर्य साम्राज्याचा व्यापार चालायचा .




या साम्राज्यात संगम साहित्य  जसे कि  कलीटोक्काई १०४ ( Kalittokai 104) विकसित झाले होते , म्हणून याला संगम काळ असे हि म्हंटले जाते , हे साहित्य

१- मुधळ संगम 
२- इडाई संगम,
३- कडई संगम, म्हणून ओळखले जाते सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-


संगम साहित्यामध्ये ४६३ कवींनी एकूण २३८१ कविता रचिल्या आहेत .ज्या काळात या कविता रचल्या गेल्या त्या कालखंडालाच संगम काळ असे हि म्हंटले जाते .संगम साहित्यातील या कविता समाजातील प्रत्येक वर्गाने पुरुष व स्त्रियांनी साधारण पणे  100A.D  या काळात रचल्या होत्या . पुढे १९व्य शतकात तामिळ अभ्यासक अरुमुगा नाव्लार,  स.व.थामोदारपिल्लाई , आणि   य.व.स्वामीनातन अय्यर यांनी समोर आणल्या .
मोहेनजदाडो आणि हडप्पा सभ्यतेची लिपी हि सुमारे १ लाख वर्ष जुनी आहे . र.माथीवानन Tamil Etymological Dictionary Project of the Government of Tamil Nadu चे मुख्य संपादक यांनी १९९१ मध्ये असा दावा केला कि सिंधू संस्कृती चे सर्व साहित्य हे तामिळ लिपी मध्ये मिळते जुळते  आहेत . देवानेया पवनार यांनी २००२ साली तामिळीयन  अथवा होमो द्रविडी लोकांच्या उगमाची  अशी माहिती पुरवली आहे :-
** २००,००० ते ५०,००० ख्रि.पु. :- तामिळी अथवा होमो द्राविदियानंचा ची उत्पत्ती.
** २००,००० ते १००,००० ख्रि.पु. :- तामिळी भाषेची सुरवात .
** ५०,००० ख्रि.पु. कुमारी कंदम संस्कृती .
** २०,००० ख्रि.पु :- इस्टर बेटावरील Easter Island  हरवलेली तामिळ प्रगत संस्कृती .
** १६,००० ख्रि.पु. :- लेमुरीया  अथवा कुमारी कंदम बुडाले .
** ६०८७ ख्रि.पु. :- दुसरे तामिळी संगम पंडीया राजाने स्थापन केले .
** ३०३१ ख्रि.पु.:- छेरा राजकुमार ने अरण्यात भटकत असताना जंगली उस पाहिला, आणि त्याने सध्याच्या   तामिळनाडू मध्ये त्याची लागवड करण्यास सुरवात केली.
** १७८० ख्रि.पु. :- पांड्या राजाने तिसऱ्या तामिळ संगमाची स्थापना केली .
** ७ व्या शतकात ख्रि.पु.:- तोल्काप्पियाम Tolkappiyam (सुरवातीचे तामिळ व्याकरण )
तामिळ नाडूचे एक विद्वान अभ्यासक


एझहुथांगा नाडू “Ezhuthanga Nadu” ( ७ x७ = ४९ देश ) असल्याचे सिल्लापथीकरम  मध्ये नमूद केले गेले आहे .म्हणून दक्षिण तामिळनाडू आणि कुमारी कंदम हे वेगळे प्रदेश होते ,जे लोक दक्षिण तामिळनाडू कडे वळले त्यांना पंडीयन म्हंटले गेले आहे .पांडियन लोकं सिलोन Ceylon आणि तिरूनेलवेल्ली  Tirunelvelli. या प्रदेशात पसरले. तामिळ साहित्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात या छेरा राजांनी युद्धातील दोन्ही बाजूच्या सैनिकांना अन्न पुरवले होते, यावरून हे कळते कि पुरातन दक्षिण भारत हा सुपीक उंच  टेकड्या आणि घनदाट ज्न्ग्लान्चा प्रदेश होता .
९००० ख्रि..पु . महाभयानक प्र्ल्याने चोला छेरा आणिपांडियन राजांचे राज्य उध्वस्त केलेआणि ते सगळे येऊन दक्षिण भारतात स्थाईक झाले .
श्री अव्वाई दुरैसामी पिल्लई  यांनी " पंच द्रविडम" प्रदेश असल्याहे म्हंटले आहे ज्या मध्ये  आजचे गुजरात,महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक , आणि तामिळनाडू येतात . इराय्णार अग्गापोरूळ  मध्ये नमूद केले आहे कि ३०,००० ख्रि.पु. ते १६,००० ख्रि.पु.  म्हणजे सुमारे  १४,००० वर्षांपूर्वी  ७२ पांडियन राजांनी तामिळनाडू वर राज्य केले होते  ज्या मध्ये उध्वस्त झालेल्या कुमारी कंदम चा हि समावेश होता .

या सर्व माहिती मागे काही राजकीय उद्देश्य होता असे हि म्हंटले जाते जी द्रविडी राज्यकर्त्यांनी तेथील स्थानिक लोकांना खुश करण्यासाठी समोर आणली होती , आणि त्याला काही पाश्चात्य लोकांनी दुजोरा दिला होता , कितपत खरं आणि खोटं हे कालांतराने आपल्या समोर येईल तो पर्यंत प्रतीक्षा करुया .

http://www.tehelka.com/story_main34.asp?filename=Ne290907UNBRIDGEABLE.asp